1:42 PM
हॅमिल्टनस्य कथा
Category:
शिकागो डाउनटाऊन मधून चालताना अनेक वेळा मला हे CIBC थिएटर दिसायचं. त्या पोस्टरवरचा स्टारवरचा माणूस दिसायचा. थिएटर बाहेर नेहमीच गर्दी असायची. उंची उंची गाड्या,अनेक चांगले पोशाख परिधान केलेले लोक तिथे दिसायचे. टायटॅनिक चित्रपट पुन्हा पाहतोय की काय अस वाटायच. त्या थिएटर बाहेर ललनांची सेल्फीज साठी झुंबड उडायची. त्यामुळे हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता चाळवली होती. दर वेळी आता गुगल करू नंतर करू असं म्हणून ते राहून जात होत.
नंतर हॅमिल्टन कोण होता हे विकी पिडियावरून समजले जरी असले तरी हे हॅमिल्टन म्युझिकल काय आहे हे काही कळत नव्हतं. विमानात आयल सीटवर बसलेलो असताना माझ्या शेजारी बसायला एक कॉलेजवयीन कन्या आली. तिला आत जाण्यासाठी जागा करून देताना मला तिच्या स्वेटशर्टवर तेच हॅमिल्टनच पोस्टर दिसलं. ती हेडफोन्सवर सतत काहीतरी ऐकत होती. ते ऐकताना तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता. नंतर बोलण्यातून तिच्याकडून कळालं की हॅमिल्टन हे एक खूप चांगल संगीत नाटक आहे. पुढच्या वेळी शिकागोला गेल्याबरोबर पाहून टाकायचं असा विचार केला. तद्वत पुढच्याच शिकागोखेपेला नाटक पाहावे या हेतू ने तिकीट काढायचा एक क्षूद्र प्रयत्न मी करून पाहिला. पण शंभर-दोनशे डॉलर्स वगरे तिकिटदर पाहून एवढे पैसे एका नाटकाला द्यावेत का? असा विचार मनात आला. पुन्हा केव्हा तरी स्वस्त तिकिट मिळाल्यावर पाहू असा मध्यमवर्गीय विचार करून तो बेत मी रद्द केला. नंतर शिकागो किंवा न्यूयॉर्कला जाणे झाले नाही आणि हॅमिल्टन पाहायचे राहून गेले.
रोजच्या जीवनात पैसे, वस्तू, कपडेलत्ते जमा करण्याऐवजी अनुभव गोळा करावेत या कुठे तरी वाचलेल्या उक्तीनुसार हा अनुभव आपल्या पोतडीत टाकावा या उद्देशाने ते तिकीट घ्यायचे ठरवले. एखादा तरुण आपल्याला आवडणाऱ्या मुलीला पहिल्यांदा मेसेज पाठवताना जसा सगळा धीर एकवटून एकदाच तो सेंड करतो, तास अगदी धावत्या हृदययाने डोळे बंद करून मी Purchase वर क्लिक केले व ते महागडे तिकिट घेतले. हुश्श. आता जायचे तर ठरले. पण ऑफिसात प्रचंड काम होते. अचानक काही आडवे आले तर काय करावे अशी चिंता होतीच. जबरदस्त पाऊस आणि ट्रॅफिक मला आव्हान देऊ पहात होते. क्षणात भिजवून टाकेल असा पाऊस कोसळत होता. मी पण काही कच्च्या गुरूचा चेला नव्हतो. एवढे महागडे तिकीट काढल्यावर अक्षरश: रस्त्यावर तळे जरी साचले असते तरीही मी त्यात पोहून गेलो असतो!
अशा नाटकाला वगैरे जायचं म्हणजे पूर्व तयारी हवी. मग त्या नुसार अभ्यास सुरु केला. विकिपीडिया वाचून काढला. हॅमिल्टनच्या आयुष्यातली ठळक प्रसंग पाहून घेतले. संवाद समजले नाहीत तर उगाच गडबड नको व्हायला. साधारण किती मिनिट आधी जावे लागते? कशा प्रकारचे कपडे परिधान करावे लागतात? इथल्या नाटकांमध्ये इंटर्वल होतो का? आणि झालाच तर खायला काही मिळते की आपण आधीच क्षुधाशांती केलेली बरी? असे बरेच प्रश्न पडले होते. त्याबद्दल प्राथमिक माहिती काढून घेतली. त्यात असे कळले की ड्रेस कोड नसला तरी आपण चांगले दिसण्याचा शक्यतो प्रयत्न करावा त्यामुळे मी चांगले जॅकेट त्यात शोभेलसा कडक इस्त्रीचा शर्ट घालून तयार झालो. पावसामुळे लिफ़्ट उबर चे भाव कडाडले होते पण आता काहीही करून वेळेत पोचायचेच होते. पोचलो तेव्हा पाऊस चालुच होता. थिएटर समोर सेल्फीजचा लखलखाट सुरु होता. आत गेलो तर केवळ मला वाट दाखण्यासाठी एक तरुणी मंद हसत माझ्या सोबत माझ्या सीट पर्यंत चालत आली. माझ्या हातात तिने नाटकाचे पत्रक दिले. तत्क्षणी भारतातले थिएटरच्या मिट्ट अंधारात इथेच आहे इथेच आहे असं म्हणून जवळपास ढकलून देणारे आपले गेटकिपर आठवले. फार गयावया केल्या तर तर एखादवेळी बॅटरी चमकवून आपली सीट दाखवायचे व पुढच्या व्यक्तिकडे वळायचे. नंतर अंधारात परत ती सीट शोधायची कशी हे ज्याचं त्याने पार पाडायचं दिव्य होत. भारतीय पालकांचं पॅरेंटिंग ह्यांच्याकडून स्फुरित असेल असं मला फार वाटत. जुजबी मदत व लगेचच स्वावलंबनाचे धडे! असो.
पत्रकात सर्व पात्रांची नाव , नाटकाचे लेखक दिग्दर्शक इतर माहिती व जाहिराती छापल्या होत्या.
माझ्या आजू बाजूला मी नाटकाला एकटा आलो आहे ही जाणीव तीव्रतेने करून देण्यासाठी इतर प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था केले आहे की काय असे वाटले. डेटवर आलेले लोक इतरांना जुन्या आठवणींची उजळणी करून देत होते. एकदाचे नाटक सुरु झाले. "ऍलेक्झांडर हॅमिल्टन" या पदाने नाटकाची सुरुवात होते. या गाण्यातच थोडा पात्र परिचय समाविष्ट आहे. हे पहिल गाणं मी पूर्वतयारी म्हणून ऐकलं होत त्यामुळे ते प्रत्यक्ष साकारल जात असताना छान वाटलं व संदर्भही लक्षात आले.
हे नाटक वेगळं का आहे?
हे एक संगीतनाटका प्रमाणे नाटक आहे. पण यात मध्ये संवाद नाहीत. संपूर्ण नाटकच पदांमध्ये बसवलेले आहे. रॅप या संगीत प्रकारात ही गाणी आहेत. म्हणजे कल्पना छान आहे. ऐतिहासिक नाटक पण तेव्हा अस्तित्वात नसलेल्या संगीत प्रकारात हे मांडलं आहे . हा मेळ नाटककारांनी उत्तम साधला आहे. जवळपास २२ कलाकार यात आहेत. अनेक प्रसंगामध्ये हे सगळे कलाकार एकाच वेळी या दुमजली रंगमंचावर उपस्थित असतात. प्रत्येक जण काही ना काही करत असतो त्यामुळे ते हे सर्व एकाचवेळी पाहताना कोणाला पाहू आणि कोणाला नको अशी अवस्था होते. काही जलद नृत्य दृश्ये खूपच कमाल साकारली आहेत. हे प्रत्यक्ष पाहायलाच पाहिजे. यात फिरत्या रंगमंचाने एका नवीन मितीची नाटकात भर पडते. इंगलंडचा राजा हे एक विनोदी पात्र सुद्धा या नाटकात आहे.
उत्तम संगीत, विनोद, खिळवून ठेवणारे नृत्य, भव्य दुमजली रंगमंच, ऐतिहासिक कालखंड, २२ पात्रे यामुळे हे नाटक पाहणे हा वेगळा अनुभव ठरतो.
नाटक दोन भागामंध्ये आहे. प्रत्येक पदाचा शेवट भव्य दिव्य नृत्य, फिरत्या रंगांमंचाची कमाल, गायकी व अनुरूप प्रकाशयोजनेमुळे फारच प्रभावी ठरतात.
आपल्या मराठी मध्ये सुद्धा "घाशीराम कोतवाल" हे नाटक काहीसे या नाटकाशी जवळीक साधणारे आहे. अर्थात यातल्या कथा वेलवेगळ्या आहेत. पण राजकीय पार्श्वभूमी थोडेसे राजकारण यातही आहे.
जॉर्ज वॉशिंग्टन चे पात्र एका कृष्णवर्णीय धिप्पाड नटाने साकारले. क्षणभर मला समजलेच नाही हा वॉशिंग्टन कोण? ऐतिहासिक पात्र असूनही गोऱ्या माणसाचे पात्र कृष्णवर्णीयाने साकारले ही लवचिकता मला आवडली. अशी अनेक पात्रे वर्णभेदाच्या पलीकडे साकारलेली होती. यावर काही नाकारात्मक चर्चा झाल्या आहेत. पण मला ते वावगे वाटले नाही. या नाटकाचा मुख्य संच न्यू यॉर्क चा असला तरीही शिकागोचा संच मला आवडला.
शिकागोतल्या नाटकाचे जवळपास १४०० प्रयोग झाले आहेत. आठवड्याला ४-५ शो ते ही फुल जातात.
मुख्य पात्र ऍलेक्झांडर हॅमिल्टन बद्दल काही. तो अमेरिकेबाहेर जन्माला होता. इमिग्रंट म्हणून अमेरिकेत आलेला. अनाथ असूनही अमेरिकेत येऊन तो अमेरिकेचा फाउंडिंग फादर बनला. त्याचा अवेळी झालेला मृत्यु चटका लावणारा आहे. तो कदाचित अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष सुद्धा झाला असता. ट्रेजरी नॅशनल बँक असे बरेच काम त्याने केले आहे. कितीही महान असला तरी त्याचे पाय मातीचेच होते. त्याचे विवाहबाह्य अफेअर त्याची प्रतिमा मलीन करणारे होते. हे प्रसंग सुद्धा नाटकात आले आहेत. जास्त विचार ना करता वा अभ्यास न करताही नाटकाला गेलात तरीही चालते. कथा छान उलगडत जाईल.तुम्हाला शिकागो वा न्यूयॉर्कला जाण्याचा योग आला तर हे नाटक नक्की पहा.
आता पुढच्यावेळी त्या थिएटर समोरून जाताना माझ्या कुतुहलाची जागा आठवणींनी घेतलेली असेल.
https://en.wikipedia.org/wiki/Hamilton_(musical)
(छायाचित्रे जालावरून साभार )

Comments (0)
Post a Comment