नकार: थोडीशी पार्श्वभूमी व खुलासा

Category:


काल मिळालेल्या प्रतिक्रियेवरुन असं जाणवलं की थोडासा खुलासा करणं आवश्यक आहे. नेमका टोला कुठे लगवायचा होता किमान ते तरी सांगावं. हिंदुस्थानाने सामना हरल्यावर धोनी जसा वारंवार काही नाही कारणे देतो खरं म्हणजे त्याने काही होत नाही. गेलेला सामना गेलेलाच राहतो. काही जणांना थोडं बर वाटतं इतकंच. तद्वद कालच्या संवादाची थोडीशी पार्श्वभूमी मी सांगु इच्छितो:

संवाद गंभीर नसून उपरोधातून विनोद साधणारा होता.
हिंदुस्थानाबाहेर राहणा-या (मुख्यत्वे अमेरिकास्थित) अनिवासी भारतीय मुलांच्या लग्नाची आजकाल कशी गोची होवून राहिली आहे या परिस्थीतीवर थोडं फार काही तरी खुमासदार लिहायचा बेत होता. अमेरिकन मंदीवरच्या भरभरुन बातम्या सकाळ सारख्या वृत्तपत्रांनी छापून अमेरिकेतल्या मुलाचे स्थळ अगदी "डाउन मार्केट" करुन टाकले आहे. भारतातल्या मुली करिअरवर पाणी सोडून अमेरिकेत जायला तयार कशा नाहीत हे सांगण्यासाठी कालचा प्रपंच होता.

कालच्या संवादातील मुलगा अमेरिकेत राहत असल्याने तो त्याचा दोष असल्यागत भारतातल्या मुली तोंड फिरवत आहेत, ही सत्य परिस्थीती थोडी अतिरंजित करण्यासाठी संवादातला नायक, भारतात (म्हणजे पुण्यात) रहात असलेल्या मुलीबरोबर चॅटिंगवर संवाद साधतो व आपण बेंगलोर ला रहात असल्याचे खोटेच सांगातो. लग्न जमवण्यासाठी आता अमेरिकेतल्या मुलांना "मी भारतातच राहतो" असे खोटेच सांगावे लागते की काय या वात्रट कल्पनेने कालचा संवाद लिहिला गेला होता.

वास्तविक संवादातून हळूहळू वाचकासमोर परिस्थीती उलगडायला हवी होती. हे कसब अजून अंगी आले नाही हे जाणवले. पुढच्या वेळेला आणखी प्रयत्न करीन. धन्यावाद.

कालचा संवाद येथे वाचता येईल.



Comments (6)

तुझी सध्या फारच गोची झालेली दिसतेय. चालायचंच मित्रा, आता मुलींकडे पर्याय आहेत रे बाबा. तरी एक बरं आहे, आपल्याला अजुन हुंडा द्यावा लागत नाहीये. नाहीतर तो दिवस पण लांब वाटत नाही आता. दैनिक लोकमत ला बातमी येईल. अमेरिकेत राहणार्या तरूण अभियंता हुंडाबळी पडला ;)

I think te ढोणी nasun धोनी aahe.

समीर बदल केला आहे. धन्यवाद.

namskar dada kasa aahes?
tujhe blog ter me nehami vaachato.haa hi mala aavadala.pan kaahi prashan vicharu ka?
tujh exat name kay aahe?
biog lihinyachi prerna mi tujhya kadunach ghetali aahe.asech biogs lihit raha. thanxx...

@shailesh
Pratikriye baddal abhari ahe. Tuzi pratikriya chhan watli mala. Plz Send me your email address. I will contact you on that.
~
nilya

thanks dada,majhi pratikriya vachalyabaddal.
majha email ad.(shailesh.swap@gmai.com)
tula aani tujhya sarv parivarala majhyatarfe naatal tasech navin varshachya hardik shubhechcha