दमलेल्या बाबाची कहाणी ~ निल्या

Category:

दोस्तहो,
तुमच्यासाठी खास एक विडंबन सादर करत आहे ! "दमलेल्या बाबाची कहाणी", मला अपेक्षा आहे की तुम्हाला हे गाणं ठौक असेल. ठाऊक नसेल तर तुम्ही (टिपिकल) पुणेरी नाही !! (हे विधान आहे की टोमणा हे तुम्हीच ठरवा !)
घाई करु नका ! खालील क्रमाने गोष्टी करा

१. पयले शांत चित्ताने ते मूळ गाणं ऐका.
२. भावना समजून घ्या.
३. आमच्या विडंबनाचा विडो पहा. (विडंबन वाचण्या पेक्षा ते अनुभवा.)
४. ज्यांना वेळ आहे व ऑफिसात काम नाही ते एक ओळ या व्हिडोची व एक ओळ त्या व्हिडोची असं पाहू शकतात.
५. आवाजाला माफ करा. आम्ही काही अजून गायक बनलेलो नाही.
६. प्रतिक्रिया लिहा !

नोंद:
१. आमच्या विडंबनालाही एक पूर्णत्व यावे म्हणून आमुची सवताची काही कडवी भरीस टाकली आहेत. तेवढी गोड मानून घ्यावीत.
२. वापरलेली छायाचित्रे गुगलने आम्हाला दिली आहेत. यात कोणाचे चित्र आले असेल तर त्याने ते मागून परत घेवून जावे.
३. माझा व्हिडो पाहिल्या शिवाय प्रतिक्रिया देण्यास मनाई आहे.

मूळ व्हिडो:




आमचा विडंबनाचा व्हिडो:



दमलेल्या बाबाची कहाणी ~ निल्या

मार खाऊन निजलेला एक मी हा प्राणी
सुजलेले तोंड डोळा सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नाही
माफी कशी मागु बापा मला तोंड नाही

झोपेतच बाप मारी लाथ पेकाटात
उठ भाड्या कर अभ्यास म्हणे तो घुश्श्यात
सांगायची आहे माझ्या होणा-या पोरा
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला

आटपाट नगरात पोरी होत्या भारी
घामाघूम बाबा करी गल्ल्यांची वारी
रोज सकाळीस बाप निघताना बोले
चार विषय तुझे का राहुनिया गेले
जमलेच नाही पास होणे मला जरी
बाप म्हणे पाय ठेवू देणार नाही घरी

स्वप्नातल्या गावामध्ये पटवल्या लय पोरी
खर्या खुर्‍या पोरी साठी गेलो तिच्या घरी
पोरीच्या भावांनी लय मारीले मला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला

कधी कुठे सुत आमचे जुळलेच नाही
पटव पोरगी असं मन बोंबलत राही
दिले फूल एकीला तिने घेतलेच नाही
अपमान केला इज्जत ठेवलीच नाही
झाला पचका कॉलेज मध्ये आमुचा उगीच
आलं पीक गव्हावानी कॉंमेंट्सचं सुगीचं
दोस्तांनी पण आमचा उडवला फज्जा
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला

पोरीच्या नादात कॅंपस गेला हो निघून
नोकरीची आशा सारी गेली ती संपून
कंपन्यांनी घेतली होती कवाडे मिटून
टेस्टिंग कोर्स केला शेवटी पैशे भरुन
लावले लग्गे जिथे तिथे दोस्तांनी मिळून
लढविला किल्ला सा-या बाजू सांभाळून
तवा कुठे लागला जॉब हा मला
दमलेल्या बाबाचीही कहाणी तुला

बॉस म्हणे कर काम वा प्रमोशन नाही
केले जरी काम तरी न मिळते हो काही
ऑनसाईट सुद्धा बॉस जाऊ देत नाही
कान भरी कलीग त्याचे सांगून काहीबाही
अंगाचीया माझ्या होतसे हो लाही लाही
"गोड बोला" मंत्र जपला मी हा बारमाही
बटर संगे स्कॉच त्याले मारिले पुन्हा
दमलेल्या बाबाचीही कहाणी तुला

तुझ्यासाठी बाळा मी शोधतोय आई
धुंडाळले मॅट्रिमॉनी हाती काही नाही
तुज्यासाठी फिरे आजा तुझा दिशा दाही
तुझा रंग गोरा व्हावा सो गोरी हवी आई
अशी पोरगी त्याले तरी गवसत नाही
मिळे कन्या लग्ना जरी उभी न ती राही
कधी येते नाड एक कधी मंगळ आडवा
दमलेल्या बाबाची ही कहाणी ऐक गाढवा
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला

ऑफीसात उशिरा मी असतो बसून

भंडावले डोके जाड पोरी या बघून
तास तास जातो चांगली पोरगी शोधून
एक एक स्थळ जाते हळूच निघून
अशावेळी काय सांगु काय काय वाटे
तिचा फोटो बघून पाणी डोळ्यातून दाटे

वाटते की उठुनिया भारतात जावे
शोधून कन्या एक पुन्हा प्रेमात पडावे
गुंतुन एकीत लग्न करावे दुजिशी
जीवघेणे खेळ काही मांडावे आपुल्या देशी

गोष्ट माझी सांगताहे ऐक बाळा काही
जोडीदार महत्त्वाचा करिअर होत राही

कॉलेज मध्ये जास्त नखरे करु नको रे मुला
मिळेल त्या पोरीशी सेटिंग करुन टाक रे पोरा

कुणा एकी साठी नको होवू रे खु्ळा
एक जाता दुसरी शोधून काढ तू बाळा

बाबा सांगे चांगल्या पोरीवर असो डोळा
भाळी तुझ्या योग्य वेळी लागेल हा टिळा
हनिमूनला बाबा तुला आठवेल का रे?
बाबासाठी येताना काही आणशील का रे?

सांगायची आहे माझ्या होणा-या पोरा
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला

तरुणपणी बाबा तुझा होता आंधळा
दिसले न प्रेम त्याला आले किती वेळा

बाबापरी नको करु माती आयुष्याची
काढ डोळ्यातून तुझ्या गाठ अहि-याची
सोड भीती जाईल हे आयुष्य मजेत
हवी कोणी तरी संगे येशील खुशीत

सांगायची आहे माझ्या होणा-या पोरा
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला
ला ला ला ला ला, ला ला ला ला

~निल्या

Comments (133)

लई जाक रे निल्या. अप्रतीम आहे. आपण या गाण्यावर एक स्पर्धा आयोजीत करू शकतो. या गाण्यात किती वेळा ला ला आले आहे सांगा ? याचे उत्तर फक्त शम्मी कपूर देऊ शकेल. आता इतर लोकानी शम्मी कपूर का असा उलट प्रश्न करू नये.....

हा हा हा
मी साला रात्री १ वाजता ऐकत बसलो होतो..
बाजुला कुत्री भुकांयला लागली...
आटपाट नगरातल्या पोरी लई भारी आहेत...
चांगला प्रयत्न आहे.. फोटॊ चांगले select केले आहेत...
... मला आवाडलेली लाईन..
"कॉलेज मध्ये जास्त नखरे करु नको रे मुला
मिळेल त्या पोरीशी सेटिंग करुन टाक रे पोरा" ...
.. मी खुप भयानक हसतो आहे रात्री ते पण एकटा..
बर्याच गोष्टी खर्या आहेत.. अनुभवाचे बोल दिसता आहेत.. सांग जरून तुझ्या पोराला.


PS : बाकी public पहीला video शेवट पर्यंत बघा लास्टला एक मस्त item आहे.. :D

Dhamal lihile aahes Abhijit ! hasun hasun vaat lagali !!!!! Video jhakas aahe ! A-1 !!!!!! :D

Nilya sahi aahe....Antya pratikriya pan jor dar aahe tuzi..ani sujya chi hi....
Line tar path zali mala ti apo aap......college madhe jasta nakhre karu nako re pora...[:)]
Naadd khula re bhava....Jiklayis.....[:)]amche OSU kolhapuri maratha warriors che khas words aahet he....

Hey Nilesh.....

Very good efforts buddy....khup chaan lihil aaNi gayalas dekhil...

Thanks for a quality entertainment...!!!

Chan!

Ek number bhava...!!!
complete naad khulaaa..!!

@Sujit धन्यवाद सुज्या ! हाहा छान होती कल्पना !
@Aniket धन्यवाद भावा ! फोटो निवडून त्यावर शब्द टाकण्यातच ५ दिवस गेले. थोडा अनुभव थोडी कल्पना!
@Gauri धन्यवाद गौरी. आवर्जून प्रतिक्रिया देतेस !
@विश्व्या: मला जिंकवल्याबद्दल आभार !
@संगमनाथ: ब्लॉगवर स्वागत. मी निलेश नाय ओ. निल्या माझ्या आडनावाचे छोटे स्वरुप आहे. प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.

@Abhijit पाटला लय भारी रिप्लाय दिलाव तुमी! चक्कार टाकीत जा अधूनमधून!

Mast aahe re................... ek number

अप्रतीम रे !!!
Incredible man!!!

Photo collection, comments at the time of la la la and content were extraordinarily great.

In all it was AWESOME ... Keep up with such creativity ... :)

मस्त आहे,एकदम भारी...

AWESOME! lai bhaari :)

ek number ahe nilya....
mala download karayche ahe....special net cafe var alo hoto tujha he gana aikayla...!!!

jabardasta..! sahi ahe!

Apratim!!! Na bhuto na bhavishyati.

Ek Number ekdam original

1 number ... lai bhari :)

mee pharach bhavuk zaalo aahe kavita pahun\aikun\vachun....

"ghamaghum baba kari galyanchi wari" he mee hundake det aikale.....

Nilyaa, toDalas, foDalas lekaa!!!
lai bhaari aahe he. khuup khadkhadun hasle mii. :) :) esp. la la la la ............kyaa baat hain!!

ha video Orkut var koni takla hota... ekdam khas banla aahe... gr8... aflatun vidamban...d

लई झ्याक रे निळ्या .
अस्सल पेक्षा नक्कल श्रेष्ठ म्हणतात ते असं .
पहिल्या विडेओत डोळे पुसणार रडणार पब्लिक दाखवलाय ते पण ओढून ताणून
तर तुझ्या विडेओत पब्लिक जमिनीवर पडून गडाबडा लोळतय बघ हसून हसून
तुझं गाणंच खरखुर आयुष्यावर बोलणारं आहे
आणि आवाजाचा म्हणलास तर तुझा आवाजच जास्त रंगलेला वाटतोय या विडंबनात
फोटो सिलेक्त करताना डोका वापरलाय तुम्ही. "हे असं आहे होय ...च्यामारी " किंवा
ला ला ला ला चे कॉम्मेंत्स वाचून पुन्हा सलील-संदीप असलं "ला ला ला ला ला ला "
टाकायचं धाडस करणार नाहीत आयुष्यात.

आयुष्यावर बोलू काही ची सिरीयल कर तयार ........ बेस्ट लक
देव तुझ भलं करो

@Anup,Sheetal,amitHK,Sonali,Sumit,Nilesh, Sudhir,Anamik, Rahul Bhagat प्रतिक्रिये बद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे.
@ anirudha pahun\aikun\vachun छान वर्णन केलेत तुम्ही आमच्या प्रयत्नांचे. घामाघुम बाबा ही स्वानु्भवावरून सुचलेली ओळ आहे! प्रतिक्रिये बद्दल आभार.
@ Dhanashri: उत्सफूर्त व प्रेरणादायी प्रतिक्रियेबद्दल आभार. अशी तोडातोडी चालू ठेवेन.
@धन्यवाद.Saurabh: Orkut वर हा व्हिडो कोणी टाकला होता? नाव कळू शकेल का.
@Vinayak
मोठ्या व सखोल प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
आता पर्यंतची सर्वात छान प्रतिक्रिया. आपले थोडे थोडके आहेत तेवढे अनुभव खेचून लावले इथे. आवाजावर मेहनत चालू आहे. तु्म्हच्या कडून मिळालेली पावती खरंच खूप आत्मविश्वास वाढवणारी आहे.
कशा ना कशावर काम चालू असतं. अशीच रसिक दृष्टी ब्लॉगवर असु द्या.
>>देव तुझ भलं करो !! :)

अप्रतिम विडंबन केले आहे राव. ओळींना साजेसे फोटो टाकलेल आहेत. आवडले फार आवडले.

एकदम मस्त बनवला आहे व्हिडीओ. आत्ताच माझ्या भावाला लिंक पाठवली.

खुपच छान ... जसा ओरिगिनल विडियो पाहून डोळ्यात पाणी येते ...तसाच हा विडियो पाहून हसून हसून पूर्ण वाट लागते ....:)
खुप मेहनत घेतली आहे ... really appreciated !!.. कीप इट अप !!!

निळूभाऊ, ऑर्कुटवर हा व्हिडिओ प्रोफ. सुरेश खेडकर ह्यांनी फेवरेट म्हणून टाकलेला. ("झेंडूची फुले" परंपरा(विडंबन) ह्या कम्युनिटीचे ओनर) मीपण शेअर केला आहे. ;) आणि ते पाहून इतर मित्रांनीपण फेवरेट म्हणून टाकलाय... :D

@Ravindra
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे!

@कांचन:खूप आभारी आहे. भावाला आवडला की नाही? तुम्हाला हा दुवा त्याला पाठवावासा वाटला यातच सारे आले !

@मन माझे !
प्रतिक्रिये बद्दल आभार!
@Sarabh
मला हे आवर्जून सांगितल्याबद्दल आभारी आहे.
सुरेश खेडकरांचे व्हिडो कुलुपबंद असल्याने दिसले नाहीत. तुम्हाला वाटल्यास तुम्ही त्यांच्या कम्युनिटिवर ह्या व्हिडोचा एक धागा काढू शकता.
मित्रांना पण आवडतंय हे ऐकून बरं वाटलं
प्रतिक्रियेबद्द खास धन्यवाद.

Jhup sahi lihilaya
baryach divsani ek changle vidamban vaachnyacha yog ala

Salil Chaudhary

Maanla buva...
ek number kaam kele aahe...

Mast Mast ...
Mast Mast Mast !!!!

aaeshapath 1 nooooooooooooooo.........hasun hasun yeda zaloy me..... 1 number nilya.........

Ek number aahe ... Original Gana tar apratim aahech pan tuza widamban pan sahich jamlaay

निळ्या आपण हे बाजारात "गर्भसंस्कार"ह्या नावाने का नाही विकत ???
डॉ श्री बाळाजी तांब्याना बरीच तगडी स्पर्धा होऊ शकते.....,
चाली शी बरेच चाळे केल्याने "चाल"करी दुखावले जाण्यापेक्षा जास्ता सुखावले च असण्याची शक्यता आहे.....
ला ला लाSSSSSS ला ला ला लाSSSSSSSSSSS!!!

class yar... dhamal aali aiktana.. hasun vat lagli... mastach.....

Nilya mitra............
maja ali gan aikun........tuz dok laii bhari hay.......
kay kalpana shakti hay ....college che kisse lai mast lihales...... ani sarvat mahtvach tyatle photoes .......khup avadla mala.
mi mhazya saglya mitran na sudha download karayla sangitlay.
asch pudhe kahi teri karat raha...

एक नंबर.......निल्या. !! झकास आहे एकदम...
पुढचे विडंबन कधी ???????

धन्यवाद !!

Jabardast,bharapur maja ali.

jhakas

jhakas

ekach number mitra .....jiklayes re tu.......

Ek dum bhari mitra...... jinklas leka..... ek no. creative vichar.... salil ani sandeep hyanahi avdel asa vichar madla ahes.........

एकदम मस्त बनवला आहे व्हिडीओ

Apratim...Aflatun...Bharii...!!!
No more words to explain..... :)

good job..mitra

Simply Jabardast!!! hats off to ur creativity!!!
सांगताहे ऐक बाळा काही
जोडीदार महत्त्वाचा करिअर होत राही!
It should be Anthem for fellow batchler loosers! :)

foto mahye kutra mhanto "la la la la la" sampale ki mala uthava !!
HAHAHA !!

waadhiv hota ha !! :) ;) :D

lai bhari nilya
pudhle vidamban kadhi?

you are awesome!!!

Great, layee bhari

वा अभ्या ! खूप दिवसानंतर तुझा ब्लॉग बघतोय! फारच अफलातून विडंबन आहे! क्रिकेट कमेंट्री
मध्ये म्हणतात ना टेक्स्ट बुक शॉट तसे हे टेक्स्ट बुक विडंबन आहे! उदासबोध आठवले मला. खूप छान!

सगळ्या प्रतीक्रिया वाचून ही छान वाटले !

Khoopach chan prayog , avadal re.. lagich saglyala pathavato ...

khup chan ahe video...original videocha apman zala ahe ase kahi vattat nahi..ulat jast maja yete..lai bhari..

lay bhari zala mitra, ekdam danka...
nilya aapala photo pahayala milel ka?
darshan ghyaychaye.....

Top.... Top.... & Top..... Too good creation..... Jabardast compilation.... Hasun hasun damlo.... Ata hya damlyachi kahani nako... nahi tar punha la la la la...
He lihitanahi hasu yetay....

Prachanda bhari!!

Tuffaan !!!!! ani awaj hi farach match hoto Salil Kulkarni chya awajashi !!!!! Vidamban chalu rahu det !!!!! Apratim !!!!

Ajun ashi vidamban yet rahu det !!!

hey awsm yar.........ekdam bhari.....khas karun la la la la la la....n photos pn solid selct keles.....hats off......

apratim........thumbs up....!!!!!!

Ek number mitra ...!Photo collection mast match kela kavitela.

the pics with la la la la are hilarious.

अतिशय उत्कृष्ट मनुष्य आहेस रे तू..
खूप उशीरा मिलाली तुझी ही पोस्ट वाचायला.. पण यू मेड माय डे..
क्या बात..क्या बात..क्या बात....आणि मिथुन स्टाईल मधे रोव्होल्वर मधून सहा गोळ्या हवेत..

लव्हली..

सगळेच ला ला ला ला.....खुपच आवडले...

खूप भारी... हसून हसून येडी झाले..I like डोके भांडवले जड पोरी बघून हाहा funny..
तुझा रंग गोरा व्हावा सो गोरी हवी आई ही ही ...

एकदम झकास

एकच कॉमेंट .. ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ... :द


एक नंबर ..लय भारी निळू भाऊ .. !!

lai bhari bhau............

ए निल्‍या एकदम मस्‍त

आणि आवाजही तुझा लई भारी

खूप छान

दीपा

Survat ek number. Navi chal aahe chal mhanale tar chalatach sutli aahe basatach nahi.
Excellent Pun! Keep it coming dude!

Aamchya Nagpur chya bhashet mhanayache zale tar Ekkkk Numberrrrr....!!!! shevatche 2-3 kadve kinchit julale nahi. Pan ekandarit khup chan. Photos & comments zakas taklet.

If not intended to insult and Hurt the original artist.. then it's best...

naad khula re nilya.....

खुप छान....गाण खुप छान लिहिले आणि गायले आहे....विडियो पण खुप विनोदी आहे...especially the comments on ला ला ला ला :-)

nilu da tumhich ho tumich
laeee bhari

प्रतिक्रियांना उद्दर देण्यास उशीर झाला त्याबद्दल मी सर्वांची आधी माफी मागतो.

@Salil Chaudhary प्रतिक्रियेबद्दल खूप आभारी आहे.
@Salil Chaudhary तुम्हाला काम आवडल्याचे पाहून बरे वाटले
@Nutan: Thank you.
@Shankyप्रोत्साहना बद्दल आभारी आहे.
@Dipya:धन्स.
@mukulधन्यवाद. गर्भसंस्कार..नको नको लोकांचे गैरसमज व्हायचे.व चालक-यांनी ऐकले की नाही ते माहित नाही अजून.
@Rahul: Thanks
@Vipul: धन्यवाद मित्रा. आवडल्याचं आवर्जून कळवल्याबद्दल आभारी आहे.
@Nitin Kadam:धन्यवाद मित्रा. विडंबन सोडून अजून काही तरी वेगळं करावं असं मनात आहे. भेट देत रहा.
@Anonymous, Raj P, sar007 Thanks a lot mitrano.
@Yogesh धन्यवाद मित्रा.
@Anonymous Thanks
@Maithilee आभारी आहे.
@Anonympus आभार.
@prasad बॅचलर असला म्हणजे लूजर असं नाही रे पण "अभ्यास करायचा" म्हणून तिकडे लक्ष जरा कमी पडत लोकांच. प्रतिक्रियेसाठी आभारी आहे.
@Bipin: ही कोटी तुम्हाला आवडली. बास आणि काय पाहिजे
@Sahdev धन्यवाद मित्रा.
@PJ Ganesh Thanks

@ आशिष: क्रिकेट कमेंट्री
मध्ये म्हणतात ना टेक्स्ट बुक शॉट तसे हे टेक्स्ट बुक विडंबन आहे!
धन्यवाद आश्या.एवढी चांगली उपमा दिलीस त्याबद्दल आभारी आहे.
@Anonymous प्रयोग आवडल्याचे कळवल्याबद्दल थॅक्स
@Ganesh: धन्यावाद.
@Yogesh: तुमची इच्छा लवकरच पूर्ण करण्याची माझी इच्छा आहे.
@Orion Studios: टॉप तुम्ही विषेषण म्हनून वापरलं असलं तरी आम्ही उपमा म्हणून स्विकारली. धन्यवाद हो साहेब.
@Ashish Sane धन्न्स
@A Phoenix आवाजाची तारिफ केल्याबद्दल आभारी आहे.
@POoja धन्यवाद.
@Rajiv धन्स मित्रा
@Anonymous आभारी आहे

@नचिकेत
तुमच्या सारख्या प्रथितयश ब्लॉगकाराचे आमच्या ब्लॉगला पाय लागले. आभारी आहे.

>>>अतिशय उत्कृष्ट मनुष्य आहेस रे तू..
खूप उशीरा मिलाली तुझी ही पोस्ट वाचायला.. पण यू मेड माय डे..
तुमच्या सारख्या उत्कृष्ट कथालेखकाचा काही श्रमपरिअहार आमच्याकडून झाला असेल तर आम्ही स्वत:ला धन्य समजातो.

@ Chaitrali Menkar लालाला मलापण आवडले.
@ Ashwini आईशपथ तेव्हा डोके भंडावले होते. भावना त्याच शब्दात मांडल्या आहेत.
@ Ghanashyam धन्यवाद मित्रा.
@ Vibhas तुमचे नाव मला खूप आवडले. प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
@ Bhavesh Prabhu धन्स
@ Deepa आवाजाला चांगलं म्हटल्याने छान वाटलं खूप आभारी आहे.
@ AAL जवळपास माझ्या प्रत्येक वाक्याची दखल कोणाकडून तरी घेतली आहे. ही कोटी तुम्हाला आवडली म्हनून बरं वाटलं.
@ Aditya नागपुरकरांनी आमचे अभिवादन स्विकारावे. काही कडवी आवड्ली नाहीत ही प्रामाणिक प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभारी. आणखी सुधारणेसाठी जागरुक राहू.
@ Dhanajay व्हिडो च्या सुरुवातीलाच तसं सांगितलं आहे की केवळ करमणूक हा उद्देश आहे. कुणाला दुखवाय्चा किंवा त्या मूळ भावनांची टर उडवण्याचा उद्देश नव्हता. मूळ गाणॆ ऐकून मलाही त्या भावनांचा आदरच वाटत आलेला आहे.
@ Swapnil नाद खुळा रे भावा. लै भारी. धन्यवद मित्रा.
@ Anamik धन्यवाद मित्रा. प्रतिक्रिया मस्तच एकदम. हे माझे बेस्ट क्रिएश्न आहे असे वाटते.
@ Priya प्रतिक्रिया देणा-या तुम्हीच हो !
धन्यवाद. खूप आभारी आहे.


सर्वांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्यामुळे मी सर्वांचा खूप आभारी आहे. अशा प्रतिक्रियांमुळे काही करण्याचा उत्साह दुणावतो. या व्हिडिओ ने नुकताच २३ हजारांच्याहून अधिक व्ह्य़ूजचा टप्पा ओलांडला आहे. धन्स धन्स धन्स !

Naad Khula!

khup chan

la la la la ... varchya cpmment bhari ahe..

Ekadam fakkad boss. La, La, La, La

La la lala laaaaaaaaa !
oh sorry !
pan EXCELLENT !

Chhan.... ekadam aawadal he vidamban...sadhyaa aamachi parikshaa suru aahe, mhanun tention hot pan video pahilyaapasun khup relax fil hotay. carry on

तोडलस रे मित्रा...जबरदस्त खरच जबरदस्त...अव्वल नंबर..लय भारी...!!

nilya lai bhari

lai bhari original peksha bhari nilesh rao jaunddya jorat best man keep it up

apratim,Nilya
mala khup avadley...
keep it up ajun khup baghyala avdel.
Yogesh

kharach mi kiti tari divasane tuzya la la la yavar hasale.khub bhannat.kase suchate tula.ratriche 12 vajun 40 minut jale .ekati hasate.bharya koni ajubajula nahi tey.college che mitra athavale bicharre.

zakaas................apratim!!

zakas...apratim!

sorry i cant write in Marathi font. Pan mazya bhavana marathich aahet. Chaaan chaan chaan .... mast aahe re.... tuzya kalpana shaktila dad dyavishi vatate. asach lihit raha...
... Narendra

Khuoach chan lyrics ahet.
ani photo collection pan gar mast ahe.
ani ho tujha awaz tar khupach chan ahe.
keep it up.
my best wishesh with u.

kay sangu mitra manatl bolalya sarkhe vatat hote...........
pahila kramank means 1 no.

La la la la la la... ekdam sahi... re ... "shabd nahit re dusare" APRATIM.

Good really impressed from ur talent , plz send me ur updates

ther is so cheap thinking in this poem n meaning less i dont know what u get by making this worst poem.

Lae bhali nilya keep it up asach lihit ja kahitari ved-vakad

प्रचंड प्रचंड प्रचंड भारी.लोळतोय मी नुसता .
एक नंबर .
बझ वर लिंक शेअर करतोय

निल्या...जाम हसतेय मी एकटीच.....
आमच्या बाबाला मागे तो सिरियसबाबावाला विडिओ पाठवला होता आणि बिचारा उदास झाला होता..आता त्याच्यावर उतारा म्हून ह्यो धाडलाच पाहिजे...
मला ते आता महिनाभर दूध घालू नको पण ला ला ला आवर म्हटलस नं त्याने एकदम लोटपोट बघ...लिहायचं तर सगळीच वाक्य लिहावी लागतील....
तोडलंस फ़ोडलंस.....वरिजिनलवाल्यांना धाडलास का रे??..::P

आपली कलाकारी अती उत्तम. महेन्द्र कुलकर्णींना धन्यवाद त्यांच्यामुळे तुझा ब्लॉग सापडला.

आपली कलाकारी अती उत्तम. महेन्द्र कुलकर्णींना धन्यवाद त्यांच्यामुळे तुझा ब्लॉग सापडला.

great yaaar .......... ! hi link sandip khare la pathav .....veda hoil to ...>! sahich aahe ...!

अफलातून विडंबन. अगदी संदिप खरे यांच्या कवितेतून जशा भावना पोहोचतात तशाच तुमच्या कवितेतूनही भावना पोचल्या. प्रत्येक "ला ला ला" च्या स्क्रीनवरील चित्र आणि कॅपशन अप्रतिम. निळूभाऊ आपला ब्लॉग आता वाचतेच. :-) अजुन काही विडंबनं असतील तर येऊ द्या.

ला ला ला ला ला ला ला ला ला :)


खुप आधीच हा वीडियो बघितला होता यू ट्यूबवर..पण प्रतिक्रिया आज देतोय. अप्रतिम विडंबन आहे निल्या.
लैई लैई भारी...

अस्खलित .......
कल्पना, शब्द, चाल..आवाज,...फोटो ...सगळेच :)

sunder palady.best of luck for another one

ncie poemmm office madhe kantal alla hota fresh vatle tuza video bagun thanx to tejasvi tichya video madhun bagitla

मस्तच.....

Cheap!!
Unjustifiable with the emotions of the original one..

Also you should virtually take permission of the original poet.


Regards,
Hemant

खुप खुप छान!!!

जित्क्यंदा ला ला ला तित्क्यंदा खुप खुप छान

its really good... khup chan yapeksha changale vidambam kadhich ekale nhavate

Jagaat Bhari! Ajun barech vidamban ikayachi ichha ahe.

zakkas.......keep up this amazing creativity!

kharrab bhaari re... lai awadla aplyala...:D

ultimate yaar ...
like it very much

Vidamban.. khupach chhan aahe.
I liked the effect of Sandeep Khare in between (poem in between)

Enjoyed the photographs, lines

La la la la ...
la la la la...

Nilu bhau lay bhari.!!!!!!!!!!!!!!!

Lay mhanje lay.......ch bhari

original जितक सुंदर आणि मनाला भिडणार होत, तितकेच हे विडंबनही अप्रतिम आहे.....बर्याच गोष्टी बहुतेकांनी अनुभवल्या किंवा केल्या असतील....शब्द नाहीत मित्रा खूपच छान!!

Masta-visuals khoop chaan ahet.Vidamban karna avghad asta-nustich heTaai honyacha chance asto-pan changla kelay te pan.keep it up.

:)

Rahul Ranade.

Mitra mala kharach mahit nahi tu kon te but sahich watle widamban. clasach. jaml tar bhetu kadhi tari!

With Best Wishes,

Rahul.

खूपच चांगले डोके लावलेले आहे !!
आपला मिपा चा ID काय आहे ?

@Anonymous प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. मिपा आयडी निल्या१ असा आहे.

hahaha.... nilya sahich re bhai...
majhi ek friend yach original version aikun khup radaychi... mi tila he version aikaval... majha sarva group pot dhaurn dharun hasala aahe....

पोस्टला शक्य तेवढ्या प्रतिक्रिया आधीच आल्या आहेत, माझी फक्त स्टॅटीस्टिक साठी. आणखी हजार येवोत. निव्वळ धिंगाणा.. :D

Great parody. Just like P K Atre.

Farach Chaan Work From Home kartana sahaj najar padli ani aikla tar hasun hasun wed laagla surekhach aahe rao tumchi kala :) :) :)

OMG it was hilarious.I liked it a lot. Keep it up.-Smita

WOW !!! ek number. khup hasalo video pahun :)
Script lihayala khup mehanat lagali aasel. zakkaaasssss !!!!!!

baapch ree... khalach akkkha tu tar..

nice song bhava...

Tujhi Vidambana far far aawadli mala, Enjoyed it a lot. btw, i observed u hv used Accenture symbol in one of the pics. r u from Accenture by any chance?

Nilesh Bhosle

...मला आवाडलेली लाईन...
तुझा रंग गोरा व्हावा सो गोरी हवी आई

काय काय अपेक्षा असतात लोकांच्या
मस्त सुचल आहे तुला … एक नंबर आहे विडंबन

Best....